top of page

प्रख्यात हिंदी कवयित्री सविता सिंह यांच्या हरवलेल्या वस्तूंचा शोक या संग्रहातल्या कविता वाचत असताना, मला जाणवत राहिले की, मृत्यू ही मानवी जीवनातली एक अटळ घटना आहे, हे आपल्याला ठाऊक असले तरी, जुने वस्त्र टाकून आत्मा नवे वस्त्र धारण करतो, असे आपल्या मनात रुजवलेले असले तरी, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूने आपण खित्रच होत असतो. आपल्या जवळची व्यक्ती मृत्यूने उचलली असली तर शब्दातीत असे दुःख होते. त्यातही कित्येक वर्षे जी व्यक्ती आपल्या जगण्याचा, आयुष्याचा भाग झालेली असते, ती गेली तर, आपलाच एखादा भाग निखळल्यासारखी अपार वेदना होते. सविता सिंह यांच्या कवितांमधून जाणवत राहते की, आपल्यापासून दुरावलेल्या, हरवलेल्या गोष्टीचा शोक आपल्या मनात काठोकाठ भरून राहतो. एकूणच मानवी जीवनाचा अर्थ तरी काय असा प्रश्न पुन्हापुन्हा आपल्या मनात उमटत राहतो, त्रस्त करीत राहतो. आतापर्यंत न उमगलेले अर्थही जाणवू लागतात, त्याने चकित होतो आणि दुःखीही होतो. सविता सिंह यांच्या हरवलेल्या वस्तूचा शोक या संग्रहातल्या कवितांमधून अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू या विकल, हताश करणाऱ्या अनुभवाच्या अशा विविध छटा व्यक्त झालेल्या आहेत.

 

सविता सिंह यांचे पती कवी, पत्रकार पंकज सिंह यांच्या मृत्यूचा संदर्भ या कवितांना आहे. ही घटना वैयक्तिक असली तरी या संग्रहातल्या कवितांना व्यक्तिगततेच्या मर्यादा पडलेल्या नाहीत. व्यक्तिगत आणि सामाजिक, अंतर्गत आणि बहिर्गत असे दोन्ही पैलू एकमेकांत मिसळून गेलेले आहेत.

वसंत आबाजी डहाके

Haravlelya Vastuncha Shok | हरवलेल्या वस्तूंचा शोक

SKU: HVS2024
₹399.00 Regular Price
₹350.00Sale Price
  • Ordering from outside India? Please click here

Copper Coin Publishing Pvt Ltd

Shop

Be the First to Know

L5/903 Gulmohur Garden

Raj Nagar Extension

Ghaziabad 201017, Delhi NCR

India

editorial@coppercoin.co.in

FAQs

Sign up for our newsletter

Thanks for submitting!

  • Instagram
  • Facebook
  • Twitter

© 2023 by Copper Coin Publishing Pvt Ltd

bottom of page