“१९७० च्या दशकाच्या पूर्वार्थात, मराठी प्रायोगिक/ समांतर रंगभूमीवर नवीन विषय, वेगळे पाट आणि आगळी रंगाचा घेऊन आडवाटाणा-या तरुण लेखकांची एक फली उदयाला आली. दिलीप जगताप त्या फळीतला एका फुटक्या अंड्याच्या शिदोरीवर सुरू केलेल्या त्याच्या वाटचालीचा मी साक्षीदार सहकारी आहे. आज पाच दशकांनंतरही तेवढ्यात जोमाने त्याचा प्रवास चालू आहे. त्याची नाटकं आजच्या पिढीतल्या नाट्यकर्मींना त्यांच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक जाणीवा टोकदार करायला हातभार लावतात. त्याची नाटकं एकत्रित करणाऱ्या या प्रकाशनानिमित्त दिलीपचं अभिनंदन!”
अमोल पालेकर
ज्येष्ठ अभिनेता, नाट्य-सिनेदिग्दर्शक
“वाईसारख्या लहान गावात राहून दिलीप जगताप यांनी राज्य नाट्यस्पर्धेचे क्षेत्र वर्षानुवर्षे धगधगत ठेवले. स्वतःची अनेक नाटके लिहिण्याबरोबरच त्यांनी शेक्सपियर लेने, सार्वच्या नाटकाचे रूपांतर करताना इथल्या लोककलांचा बाज त्यात वापरण्याचा जो प्रयोग केला आहे तो लक्षणीय आहे. एवढ्या वर्षात जगतापांनी स्वतःची एक नाट्यशैली विकसीत केली आहे. मी केवळ राजकीय कृतिशीलता म्हणून नाटक लिहित नाही तर मानवी जगण्याबद्दलची मेडीटेशन्स चिंतने म्हणून ही लिहितो असे त्यांनीच म्हटले आहे. अशा व्यापक दृष्टिकोणातून नाटके लिहिणाऱ्या मराठी नाटककारात दिलीप जगताप यांचा अवश्य समावेश करायला हवा.”
चं. प्र. देशपांडे
ज्येष्ठ नाटककार
“कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कर्मभूमीत आणि लक्ष्मणशास्त्री, रा. ग. जाधव ते राम बापट यांच्या संगतीत दिलीपचे नाटक जोपासले आहे. त्याने दिलीपने कायमच तळागाळातील लोकांची वेदना मांडली. एकाधिकारशाही आणि धर्मांधतेच्या विरोधात दिलीप हा लिहिता डोळस लेखक आहे. मुख्य धारेपासून दूर राहून आजही वेगवेगळ्या तरुण मुलांच्या गटात त्याची नाटके सादर होत असतात.”
अतुल पेठे
ज्येष्ठ दिग्दर्शक
जा खेळायला पळ | गस्त | बळ
DRAMA (Marathi)
ISBN 978-93-84109-64-6
Hardcover
132 pages
216 mm × 140 mm
June 2021