top of page

मराठी प्रायोगिक समांतर रंगभूमीवरील एक महत्वाचं नाव ज्या काळात प्रायोगिक समांतर रंगभूमी, चळवळ म्हणून ओळखली जात होती. त्या कुळातील दिलीप जगताप हे एक महत्वाचं नाव. मराठी प्रायोगिक रंगभूमीवर आशय विषयाच्या पातळीवर विविध प्रयोग होत असताना एक नाटक रंगभूमीवर आलं. ‘एक अंड फुटलं’ लेखक दिलीप जगताप आणि दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर आणि सर्वांच लक्ष द्या नाटकाने वेधून घेतलं. नव्या नाटककाराचा उदय झाला होता. वाई स्थित नाटककार पण संवेदनशीलता वैश्विक.

तेंव्हापासून आजपर्यंत दिलीप जगताप हे नाव समग्र महाराष्ट्रातील रंगकर्मींच्या ओठावर मनात आणि हृदयात आहे. जगतापांचे महत्वाचं कार्य म्हणजे अनेक नाटकं लिहून, ती महाराष्ट्रातील विविधं संस्थांना प्रयोग करण्यासाठी दिली. राज्य नाट्यस्पर्धेत त्यांच्या नाटकांचे प्रयोग तीन तीन – चार चार केंद्रांमधून सादर केले जातात. तो प्रत्येक प्रयोग वेगळा असतो.

दिलीप जगताप त्यांच्या नाटकांमधून रूपकांचा सढळ हस्ते वापर करतात. त्यांची राजकीय आणि सामाजिक जाणीव त्यांच्या नाटकांमधून दिसते. व्यवस्थेविरुद्ध भाष्य करताना त्यांची लेखणी बोवट होत नाही. नाटक हे खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम आहे. जगतापांनी शेक्सपिअरच्या टेम्पेस्टचं चेटूकवारं या नावाने आणि ज्युलियस सिझरचं त्याचं नावाने रूपांतरही केलं आहे. दिलीप जगतापांचं मला एका गोष्टीसाठी खूप खूप कौतुक करावसं वाटतं, ते म्हणजे सातत्य. हा माणूस न थकता नाटक लिहीत आलाय. असंख्य नाट्यसंस्था उभारणीचं काम जगतापांच्या हातून होतय. प्रत्येक रंगकर्मीला ते आपले नाटककार वाटतात. असा हा वाईला राहणारा तरीही लेखनाच्या माध्यमातून सर्वत्र नाट्यप्रवास करणारा नाटककार सातत्याने लिहीत राहणारच ही खात्री.

विजय केन्करे
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक
 

रंगे हात | काठपदर

SKU: RH2021
₹250.00 Regular Price
₹225.00Sale Price
  • DRAMA (Marathi)
    ISBN 978-93-84109-66-0
    Hardcover
    136 pages
    216 mm × 140 mm
    June 2021

bottom of page