Product-Banner

Aranyahat | अरण्याहत (2nd ed.)

270.00

CATEGORY
FORMAT
Poetry
Hardcover
PUBLISHED
TRIM SIZE
2021
137 mm × 215 mm
ISBN
PAGES
978-81-929230-5-5
126

दा. गो. काळे हे मुळात कवीच आहेत, परंतु सामीक्षालेखानातच सतत व्यस्त राहिल्याने त्यांचे कवितालेखन मागे पडत राहिले. अलीकडच्या काळात ते पुन्हा कवितेकडे वळले. त्यांचा अरण्याहत हा कवितासंग्रह येणे ही आनंदाची बाब आहे.

कविता कवीकडून काय लिहून घेत असते? कविता दशांगुळे उरण्यासाठी सत्व मिळवते आणि स्वसौष्ठवासाठी रसद. अशी तमाम रसद या काळात अयण्याहत मधील कवितेने या कवीकडून प्राप्त करून घेतली आहे.

या कवितांसाठी वापरले गेलेले शब्द कवीच्या व्यासंगातून आलेले दिसत असले तरी ते अभूतपूर्व आहेत हे मान्य करावे लागते आणि कवितेसाठी कवीचे भावना-विचारांपलीकडे शब्दांवर प्रेम असण्याची गरजही अधोरेखित करते. कविता पुन:श्च विशुद्धतेकडे वळली आहे हे या कवितासंग्रहातील रचनांतून ठळकपणे जाणवत राहते.

-
+
Categories: ,

D G Kale

दा.गो. काळे. वाड्मयीन कार्य  (१) नव्वदोत्तरी शब्दवेध  या अनियतकालिकाचे संपादन. या अनियतकालिकास निर्मितीसाठी २००४ साली महाराष्ट्र फौंउडेशन (अमेरीका) या संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. (२) अतिरिक्त  या विशेष अनियतकालिकाचे सह-संपादन. आताप्रर्यंत पाच विविध विषयावरील अंक प्रसिद्ध. पुस्तके  (१) आकळ, समीक्षात्मक लेख संग्रह प्रकाशन (कॉपर कॉइन, दिल्ली एन.सी.आर). (२) अरण्याहत, कविता संग्रह प्रकाशन (कॉपर कॉइन, दिल्ली एन.सी.आर). पुरस्कार  (१) श्रेयस वाचनालय, हिंगणघाट यांचा डॉ. यशवंत मनोहर संशोधन केंद्राचा उत्कृष्ट समीक्षेचा पुरस्कार, २०१७. (२) विदर्भ साहित्य संघ, नागपूर, चा ग्रेस स्मृती साहित्य पुरस्कार, २०१८. (३) भारत सरकारची सिनियर फेलोशीप प्रदान (सी.सी.आर.टी, दिल्ली). (४) आकळ  या समीक्षा ग्रंथास महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा रा.भा. पाटणकर सौंदर्य समीक्षा पुरस्कार, २०१८. (५) साहित्य अकादमी साठी विविध वाड्मयीन विषयावर शोध निबंधाचे वाचन.

Description

D G Kale

f
1942 Amsterdam Ave NY (212) 862-3680 [email protected]

    Free shipping
    for orders over 50%