Description
Mangesh Narayanrao Kale
₹350.00
“नाळ तुटल्या प्रथम पुरुषाचे दृष्टान्त व्हाया तृतीय पुरुषाचे आगमन ते मायावीये तहरीर या कवितेची काव्यभाषा पूर्वसुरींचे संस्कार स्वीकारून प्रसंगी अव्हेरून तयार झालेली आहे. भाषेची नवी-जुनी रूपं, संकर भाषा अशा वैविध्यपूर्ण शब्दकळेतून ही कविता व्यक्ती आणि समष्टीच्या संवेदनेला शब्दरूप देते.”
“मंगेशची कविता ही समष्टीकडून ‘स्व’कडे आणि ‘स्व’कडून, ‘स्व’त्वाकडे प्रवाहित झालेली आढळून येते. आध्यात्मिक अनुभवाच्या कक्षा रुंदावणाराच या कवितेचा प्रवास आहे. भारतीय काव्य परंपरेला अध्यात्म आणि दर्शनविचार हे काही नवे क्षेत्र नाही. परंतु समकालीन प्रतिमा व प्रतिमांमधून या अध्यात्म आणि दर्शन जाणिवा नव्या परिवेशात प्रकट करणे हे दुर्मीळच झाले आहे. मंगेशच्या नाळ तुटलेल्या प्रथम पुरुषाचे दृष्टान्त या संग्रहातून त्या अधिक समर्थपणे प्रकट झाल्या आहेत.”
“‘अपभ्रंश’, ‘दृष्टान्त’, ‘चरित्र’ हे तीन कविता समूह आणि चार दीर्घकविता असे स्वरूप असलेल्या या संग्रहाची कविता नव्वदोत्तर मराठी कवितेत लक्ष वेधून घेणारी आहे . . . शैलीच्या अंगाने म्हणी, वाक्प्रचार आणि प्रतिमा यांच्यातील नवता इथे आहे. संत आणि लोकभाषेचा पुरस्कार करणारी ही कविता जशी प्रायोगिक आहे, तशीच ती भाषेचा उत्सव साजरी करणारीही आहे.”
“या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ही कविता केवळ समकालीन वास्तवाच्या परिघापर्यंत मर्यादित राहत नाही, तर काळासोबत पुढे जात असताना माणसाच्या आदिमतेची नवी परिभाषा मांडते. मिथकातील रूपक प्रक्रिया, कथावस्तू, त्यातील चरित्रं, घटनांकडे ती वर्तमानकालीन परिप्रेक्ष्यातून पाहते, मिथकांचे पुनसर्जन करते.”
Mangesh Narayanrao Kale