Description
Mangesh Narayanrao Kale
₹399.00
“मंगेश नारायणराव काळे यांच्या शक्तिपाताचे सूत्र या दुसऱ्या कवितासंग्रहात त्यांच्या पहिल्या संग्रहाने दिलेले आश्वासन पुरे केलेले आहे. पहिल्या संग्रहातच अनेक संदर्भांचा पीळ घट्ट करणारे भाषिक भान आणि ध्वनिचित्रांमधून विकसत जाणारी दीर्घ पल्ल्याची कविता लिहिण्याची त्यांची कुवत जाणवली होती.”
“मंगेश काळेची कविता एका कवीचा उच्चार, आविष्कार तर आहेच, पण त्याचबरोबर एका निराळ्या प्रकारच्या पेचप्रसंगात सापडलेल्या नव्या जाणिवेची, संज्ञेची ही कविता आहे.”
“जी भाषा ते निवडतात किंवा घडवतात तिच्यात इंग्रजी, उर्दू आणि लोकभाषेतीलही शब्द आहेत. लोकपरंपरेतील शब्द आहेत. एक संमिश्र भाषा तयार करून ते एक स्वतंत्र वक्तृत्वशैली निर्माण करण्यात यशस्वी होतात.”
“मंगेशची कविता मानवी अस्तित्व घडविणाऱ्या मूलभूत वस्तूच्या स्वरूपाचे विश्लेषण करून थांबत नाही, तर तिच्या मूलस्त्रोताचे चिंतन करीत जगण्यातल्या संघर्षाची दाहक जाणिवही आपल्यासमोर जशी आहे तशीच थेट उभी करते.”
“समकालीन जीवनाच्या ऱ्हासाबद्दल, विरूपाबद्दल, विसंगतीबद्दल सावध करण्यासाठी, मानवी अस्तित्व टिकून राहावे याबद्दलची जबाबदारीची जीवनजाणीव प्रकट करण्यासाठी, भाषेच्या अनेकार्थी प्रकटीकरणाच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी, स्वतःला मुक्त करण्यासाठी मंगेश नारायणराव काळे यांच्या कविता सातत्याने बोलत राहतात.”
Mangesh Narayanrao Kale