Description
Mangesh Narayanrao Kale
₹350.00
“विशिष्ट कथनशैली असलेली तृतीय पुरुषाचे आगमन, ही कविता एका राजकीय-सांस्कृतिक आशयाला भविष्यवाणीच्या रूपात पेश करते. ही प्रदीर्घ कविता म्हटले तर सात प्रवेशांचं नाटक आहे, म्हटलं तर दीर्घ कथानक आहे . . . ही कविता काळाच्या संदर्भात भीषण संकेत (dark forebodings) देते.”
“या दीर्घकवितेचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. नाट्यसंहिता ऋषीमुनी निर्मित आख्यान संहिता, आधुनिक काळातील भारूडाची संहिता, गद्यकथनपर गोष्टीची संहिता, कीर्तनाच्या अखेरीस येणारी उद्बोधक संहिता अशी संमिश्र काव्य संस्था येथे आहे . . . पूर्व पुराणकथांशी संवादी होत वर्तमानबद्दल बोलणारी, भविष्यावर भाष्य करू पाहणारी ही दीर्घकविता आहे.”
“या दीर्घकवितेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक मोठे आणि निबंधाची व्यामिश्र गुंफण काव्यभाषेत करणं आणि अनेक समकालीन सार्वजनिक व खाजगी संदर्भाची अप्रत्यक्षपणे केलेली मांडणी. समकालीन कवींमध्ये इतकी ‘मोटिफ’ प्रचुर वक्रोक्ती क्वचितच पाहायला मिळते . . . ही दीर्घकविता आजच्या संपूर्ण पिढीच्या सामूहिक नेणिवेत दडलेल्या अनामिक, तीव्र भीतीला काव्यात्मक वाचा देते. समोरच्या भयावह वास्तवाबद्दल ब्र उच्चारते.”
“एक रंगकर्मी म्हणून मी असे म्हणेन की, या कवितेला रंगमंचावर आणण्याचे धाडस एखाद्या दिग्दर्शकाने दाखवले तर एक महत्त्वाचे नाटक समोर येऊ शकेल. ही कविता भविष्यातल्या भयप्रद सूचनांची नांदी असून गेल्या दशकभरात कवीने द्रष्टेपणाने वर्तवलेले भाकीत खरे ठरले आहे . . . कविता, कादंबरी, नाटक या तीनही वांग्मयप्रकारांची सरमिसळ या संहितेत पाहता येते.”
Mangesh Narayanrao Kale