Usvaychay Tuzha Pashan | उसवायचाय तुझा पाषाण

299.00

CATEGORY
FORMAT
Poetry
Hardcover
PUBLISHED
TRIM SIZE
2021
140 mm × 216 mm
ISBN
PAGES
978-93-84109-60-8
120

 

उसवायचाय तुझा पाषाण  हे एक सूचन आहे. व्यक्तीकडून समष्टीकडे, ज्ञातातून अज्ञाताकडे, व्यक्तातून अव्यक्ताकडे, जगण्यातून जीवनाकडे, द्वैतातून अद्वैताकडे, सगुणातून निर्गुणाकडे, इश्क मजाजीतून इश्क हकीकीकडे जाणारा हा काव्यप्रवास आहे. परमेश्वराला प्रियकर मानणार्‍या सूफी परंपरेशी आणि भारतीय संतकाव्य परंपरेतील मधुरा भक्तीच्या कुळाशी या कवितेची नाळ जोडली गेली आहे.

 

‘प्रकृतीपुरुष’ या कवितेच्या केंद्रस्थानी असून या तत्त्वाला साक्ष ठेऊनच कवयित्रीने प्रेमाच्या आदिमतेची एक नवी परिभाषा मांडली आहे. या कवितेतला ‘पाषाणपुरुष’ हा स्त्रीत्त्वाच्या नेणिवेतील आदिम पुरुषाचे एक समग्र रूप आहे. या आदिम पुरुषाला जाणून घेणारा, त्याच्याशी एकरूप होणारा, त्याचा शोध घेणारा हा सर्जनशील काव्यप्रवास कवयित्रीसाठी आत्मशोधाचा प्रवास आहे. अंतिमत: स्त्री आणि पुरुष हे द्वैतात्मक द्वंद्व अद्वैताच्या अनुभूतीत परिणत होते.

 

आदिपुरुष व आदिस्त्रीच्या उत्कट अनुबंधाचे अंत:स्तरीय विश्व कवयित्रीच्या नेणिवेत आहे जे ‘प्रकृतीपुरुष’ या मिथकाचे पुनर्सर्जन आहे. विठ्ठलाशी असलेल्या नात्याचा अन्वयार्थ लावत ती त्याच्या मुळाशी असलेल्या आदिम पुरुषाच्या नात्याचा शोध घेत जगण्याच्या दाहक कोलाहलात हे नाते जपू पाहते. संस्कृतीच्या पटावर स्त्री जीवनाचं प्राक्तन असलेल्या अर्थशून्य व जीवघेणा दु:खभोगाचा तीव्र आकांत संयतपणे या कवितातून प्रकट झालेला आहे. स्त्री जाणिवेच्या अंत:स्तरावरील अनुभवांच्या समग्रतेमुळे स्त्रीच्या समर्पणशीलतेला आणि सत्व जपण्याच्या आत्मभानाला वैश्विक परिणाम प्राप्त होते. ही कविता मनस्वी, समर्पणशील स्त्रीचे स्वगत आहे. स्वत:लाच सोलून स्वत:च्या आरपार पाहणारी ही कविता तिच्या आत्मनिष्ठ संचिताला उत्कटपणे सामोरी जाते. मनस्वीपणे आणि तरल संवेदनशीलतेने विरहार्त जगण्याला असोशीने कवेत घेते. या कवितात असोशी, मोहक ऋजुता व निरागसतेचा वेधक मितव्यय आढळतो. काव्यनिर्मितीच्या परिणत आणि परिपक्व टप्प्यावर कवयित्री येऊन पोहोचल्याचा प्रत्यय येतो.

 

निखळ स्त्री संवेदनशीलतेतून लिहिलेल्या या कविता कोणत्याच इझमच्या चौकटीत न अडकता अर्थपूर्ण मानवी जीवनानुभवांना प्रकट करीत असल्याने त्या एकूणच मराठी कवितेला आशय, भाषिक संवेदनेचे आणि रूपबंधाचे अनोखे परिणाम मिळवून देतात. कवितेची घडीव भाषा कवितेच्या उत्कट, व्याकूळ, व्यामिश्र आशयाला सहजतेने तोलून धरते. उसवायचाय तुझा पाषाण मधील दीर्घ कविता एकाचवेळी  स्थलकालबद्ध आणि स्थलकालातीत असल्यामुळे उच्चतम काव्यात्म उंची गाठतात. दीर्घ कवितेत कथानात्मकता, भावात्मकता आणि चिंतनशीलता यांची एकसूत्रता ठेवणे आव्हानात्मक असते. हे आव्हान कविता मुरुमकर यांनी लीलया पेलले आहे.

-
+
Categories: ,

Kavita Murumkar

कविता मुरुमकर, एम.ए. (इंग्रजी), एम.ए. (मराठी), नेट, पीएच.डी. कवयित्री, कादंबरीकार, समीक्षक, अनुवादक म्हणून प्रसिद्ध. सर्टिफाईड कोर्स इन फिल्म अँड ड्रामा. अनेक हिन्दी व इंग्रजी कवितांचे मराठी भाषेत अनुवाद. तुझीच कवितामीराधाउसवायचाय तुझा पाषाण  हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. भैरवी  आणि मी सावित्री जोतीराव  या कादंबर्‍या प्रकाशित. ‘मराठी कवितेतील मिथक’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त. ‘स्त्रीशतक : स्त्री लिखित आधुनिक मराठी कविता परंपरा, प्रेरणा आणि योगदान’ हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा बृहद संशोधन प्रकल्प पूर्ण. अरुण कोलटकरांची कविता  हा आगामी ग्रंथ. सरबजीत गरचा यांच्या निवडक कविता  (सरबजीत गरचा यांच्या इंग्रजी कवितांचा अनुवाद) आणि सॉनेट मंडल यांच्या निवडक कविता  (सॉनेट मंडल यांच्या इंग्रजी कवितांचा अनुवाद) हे आगामी अनुवादित कविता संग्रह. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग. अनेक शोधनिबंध सादर. मराठी कवितेचा विशेषाभ्यास. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर विश्वकोश निर्मितीसाठी कवयित्रींच्या नोंदी अद्यावत करण्यासाठी सहभाग.  कविता मुरुमकर यांना सावित्री पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्री पुरस्कार, प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार, सावित्री साहित्य पुरस्कार, सह्याद्री साहित्य पुरस्कार, स्त्री भूषण पुरस्कार, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, रा.ना. पवार पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Description

Kavita Murumkar

f
1942 Amsterdam Ave NY (212) 862-3680 [email protected]

    Free shipping
    for orders over 50%